Shirur LokSabha 2024 | विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही-अपूर्व आढळराव पाटील 

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार अशी लढत होत आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विरोधात अजितदादांचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटीत अशी लढत रंगतदार होत आहे. सध्या शिरूर लोकसभा (Shirur LokSabha 2024) मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचार सुरू आहे.

शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या रमजान ईद च्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व  शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर तोकसभा मतदारसंघातीत भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना अपूर्व आढळराव पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचेही यावेळी अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत