बोंबला! पोलिसांनी ED अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

तामिळनाडूतील दिंडीगुल येथे एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने शुक्रवारी (1 डिसेंबर) स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

अंकित तिवारी असे आरोपी ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. अंकित तिवारी त्याच्या ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत अनेक लोकांना धमकावत होते आणि अंमलबजावणी संचालनालयातील केस बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होते, असा आरोप आहे .

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीव्हीएसी (दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय) अधिकार्‍यांनी तिवारीला दिंडीगुलमध्ये 20 लाख रुपयांच्या रोकडसह पकडले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. डीव्हीएसीने मदुराई येथील ईडी कार्यालयाचीही झडती घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी