Prakash Ambedkar | “काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar: देशभरात सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेतृत्वाखाली विरोधकांची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेत्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांना सुपारीबहाद्दर म्हटले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये उपस्थित असलेल्या सुपारीबहाद्दर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे जाहीर सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाशील. काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, असं प्रकाश आंबेडकर इचलकरंजीच्या सभेत म्हणाले.

“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर