विरोधकांची आता खैर नाही! ठाकरे गट- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता

Mumbai: मागील अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांची युती होणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या युतीवर बऱ्याचदा प्रतिक्रियाही दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) योग्यवेळी या युतीसंदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. आता या युतीसंदर्भात मोठी अपडेट पुढे येत आहे.

सोमवारी (२३ जानेवारी) ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष एकत्र येणार असून युतीसंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई (Shubhash Desai) यांनी युतीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी हात मिळवल्यानंतर याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होऊ शकतो. हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर राज्यातील समीकरणे कशी असतील?, हेही पाहावे लागेल.