Praniti Shinde: मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरमला वॅक्सिनचं कंत्राट, प्रणिती शिंदेंचा दावा

Praniti Shinde On Corona Vaccine: नुकतेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इलेक्टोरल बाँडवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला होता. अशातच आता आमदार प्रणिती शिंदे यांनीही कोरोना लसीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली, त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला मारण्यासाठी,  टेन्शन नका घेऊ पण आपल्याला व्हॅक्सिन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली,” असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?