कोण रोहित पवार? पोरकटपणा असतो अनेकांमध्ये…; प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांना सुनावले खडेबोल

सोलापूर : सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी या मागणीसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  (NCP MLA Rohit Pawar) यांनी सर्वप्रथम ही मागणी केली त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान लोकसभेची जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांची या प्रकरणात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी रोखठोक उत्तर देताना थेट कोण रोहित पवार? असा सवाल माध्यमांसमोर केला. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे पोरकटपणा असतो काही जणांच्यामध्ये असे म्हणून त्यांनी पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या या वक्ता वरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांमध्ये खडा जंगी होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी रात्रीच माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी थांबले होते असे असतानाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य महाआघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत देत आहे.

माजी महापौर महेश कोठे यांनी चेतन नरोटे यांच्यावरवर चेतन नरोटे यांच्यावर टीका केली आहे. बारामती मागणे म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना आगामी निवडणुकीत अडचणीचे असल्याचे महेश कोठे यांनी म्हटले आहे. एकंदरीत सोलापूर लोकसभा निवडणूक अद्याप सव्वा वर्षावर असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता हे महाआघाडी बिघडण्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.