हिटमॅनचा शतकी धडाका! रोहितचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार शतक, ‘हा’ विश्वविक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार

Nagpur- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेला पहिला कसोटी सामना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी खास राहिला. रोहितने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करत शानदार शतक झळकावले आहे. या शतकासह (Rohit Sharma Century) त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

ऑस्ट्रेलियाच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने एकाकी झुंज दिली. सलामीला फलंदाजीला येत त्याने १७७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक ठोकले. या शतकासह त्याने मागील २ वर्षांचा शतकाचा दुष्काळ संपवला. रोहितने या सामन्याआधी २ सप्टेंबर २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचे कसोटी शतक ठोकले होते. लंडनच्या द ओव्हल स्टेडियवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात रोहितने पहिल्या डावात १२७, तर दुसऱ्या डावात १३८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दरम्यानच्या काळात रोहित कसोटी शतक करू शकला नव्हता. पण शुक्रवारी त्याने या फॉरमॅटमध्ये पुन्हा लय मिळवली.

तसेच रोहितने कसोटीत शतक झळकावत विश्वविक्रमलाही गवसणी घातली आहे. रोहित कसोटी, टी२० आणि वनडे या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.