‘शेठ घराणेशाहीवर भाषण ठोकत होते तेव्हा फडणवीस, मुंडे, विखे, गावीत, राणे महाजन ही मंडळी टाळ्या वाजवत असतील’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीकास्त्र सोडले. काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज यावेळी मोदींनी (PM Modi speech) व्यक्त केली.

काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज आहे. मी घराणेशाहीविरोधात बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की, मी फक्त राजकीय विधानं करतो. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जातं. या दुर्भाग्यपू्र्ण्य परिस्थितीचा भारताला फटका बसत आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

मोदींचे हेच भाषण विरोधकांना चांगलेच झोंबले आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, शेठ घराणेशाहीवर भाषण ठोकत होते तेव्हा फडणवीस, मुंडे, विखे, गावीत, राणे महाजन ही मंडळी टाळ्या वाजवत असतील. असं जगताप यांनी म्हटले आहे.