अमृता फडणविसांचा आक्षेपार्ह उल्लेख करणाऱ्या अशोक गावडेंची धिंड काढली पाहिजे – होनराव

नवी मुंबई – नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांचाआक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना आपल्या भाषणात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. विशेष म्हणजे या वाचाळवीर नेत्याला आपण महिलांचा कायम सन्मान करण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या नावाने असणाऱ्या चौकात भाषण करत आहोत याचे देखील भान राहिले नसल्याचे दिसत आहे.

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी याच मुद्यावरून गावडे आणि राष्ट्रवादीवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. ‘आझाद मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची घसरलेली जीभ ही त्यांच्या पक्षाच्या संस्कृतींचे प्रदर्शन करते. यांच्याच पक्षात महिलांवर अनन्वित अत्याचार करणारे लोक मंत्री म्हणून बसलेले आहेत,हे उभा महाराष्ट्र पहातोय. भक्षवादी पार्टीचे हे जिल्हाध्यक्ष यांची धिंड काढली पाहीजे ज्यांनी अमृता फडणवीसजींचा अत्यंत नीच मनोवृत्तीने उल्लेख केला. याच पक्षात बसलेल्या महिलांना हा अपमान मान्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.