पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर पडत आहे – गांधी 

मुंबई : रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या  (Suicides) करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर पडत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केला आहे.

एनसीआरबीरने नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतात रोज 450 लोक आत्महत्या करत आहेत. तर आजच जाहीर झालेल्या ब्लूमबर्गच्या इंडेक्स नुसार (Bloomberg Billionaires Data) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani Group) जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

ते म्हणाले,रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर एका तासाला 85 कोटींची भर पडत आहे. पंतप्रधानांचे एकच काम, मित्रांना श्रीमंत करण्यासाठी सामान्य माणसांची लूट करणे. सुटा बुटातील मोदी सरकारचे त्यांच्या मित्रांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन भारत, मित्रांचा नवीन इंडिया, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.