काही नेत्यांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे – राष्ट्रवादी

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कालच्या भाषणांनंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून (MVA) टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (NCP leader Mahesh Tapase) म्हणाले, राज ठाकरेंनी शिक्षणाचा,आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असते. परंतु भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट (BJP’s Script) हीच गिरवायची आता एवढच काम राज ठाकरे यांना राहिलेला आहे.

स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला आहे. पवार साहेब यांसारख्या कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी (Fame) मिळत नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात.

शरद पवार (Sharad Pawar)  साहेबांच्या नखा इतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते. महाराष्ट्रात जातीय व धार्मिक एकात्मता राखण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम आहे आणि म्हणूनच काही लोकांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे..