Aba Bagul: पुण्यात कॉंग्रेसमध्ये भडका, नाराज आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; धंगेकरांच्या अडचणीत वाढ

Aba Bagul: देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच काँग्रेसचे नाराज नेते आबा बागूल (Aba Bagul) हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात लोकसभेची उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना जाहीर झाल्यानंतर पुण्यातील कॉंग्रेसचे नेते आबा बागूल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यातच त्यांनी आपली नाराजी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन देऊन जाहीरपणे दाखवली होती. तर उमेदवारी न मिळाल्याची खंत त्यांनी मध्यंतरी वारंवार बोलून दाखवली होती. यातच आता आबा बागूल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कॉंग्रेस अंतर्गत कुरघोड्या बाहेर येऊ लागल्या आहेत. अशातच पुणे लोकसभेची निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले कॉंग्रेसचे नेते आबा बागूल यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुर येथे जाहिर भेट घेतली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर आबा बागूल यांनी भाजपात प्रवेश केला तर धंगेकर यांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आबा बागुल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. असे असताना देखील त्यांना कॉंग्रेसने मोठी संधी दिली नाही. अशी खंत आबा बागूल यांनीच याआधी बोलून दाखवली होती. यातच  कॉंग्रेसचा उमेदवार ठरविण्याच्या आधीच  आबा बागुल यांनी लेटरबॉम्ब टाकून उमेदवारीवरून हेवेदाव्यांचा भडका उडवून दिला होता. अशातच आता आबा बागूल पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुक काही दिवसांवर आली असता कॉंग्रेसला अशा पद्धतीने गळती लागायला सुरूवात झाल्याने धंगेकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात