Amol Mitkari | डॉ.कोल्हे यांचे हसणे दुर्योधन-रावणासारखे; अमोल मिटकरी भडकले

Amol Mitkari | शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरून आलेल्या पवार संबोधल्याने मोठं राजकीय रणकंदन माजलंय. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोललेत त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर खदखदा हसणाऱ्या खासदार डॉ.अमोल कोल्हेंवर आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये.

डॉ.कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का ?असा परखड सवाल त्यांनी विचारला. डॉ. कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दु:शासन आणि दुर्योधनाच्या हसण्याशी केलीय. डॉ. कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. डॉ. कोल्हेंच्या या हसण्याचा बदला मतदानातून शिरूरची जनता नक्कीच घेणार असल्याचही अमोल मिटकरी म्हणालेय. अशा पद्धतीने कुणावर हसणं हे अतिशय विकृतीच दर्शन घडवणारे असून ‘खान हाक मारितो हसरी’ हे पोवाड्यातील कवन खासदार अमोल कोल्हेंवर लिहिण्यात आले आहे का, याचा तपास केला पाहिजे. असे देखील अमोल मिटकरी म्हणाले. ज्याप्रमाणे दुर्योधन, दु:शासन आणि रावण हसले होते त्याच पद्धतीने हसण्याचा पाप कोल्हे यांनी केले आहे. कोल्हेंच्या प्रवृत्तीचे खरे दर्शन या निमित्ताने समोर आले आहे. मात्र याचा हिशेब सर्वसामान्य जनता त्यांच्याच मतदारसंघातून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय.पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नसल्याचेही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात