शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

अहमदनगर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विद्यार्थ्यांला मुंबईत आणून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश नारायण गोटे असं या २९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. त्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासहब महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबत ट्विटरवर अपशब्द वापरले होते. यानतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.