Pune Crime : शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला, सरपंचाचा जागीच मृत्यू

Pune Crime News:  पुण्यातील (Pune News) शिरगावच्या सरपंचांचा धारधार शस्त्रांनी हल्ला करून खून करण्यात आला आहे.  प्रवीण गोपाळे (Pravin Gopale) असं या मृत सरपंचाचं नाव आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र जमिनीच्या वादावरुन ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेनं मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले आहेत. या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला.  प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते.