Pune : एकाला संपवलाय, तुला पण संपवतो…!; मनसेच्या धडाकेबाज नेत्यावर गोळीबार

MNS : पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर धमकी देऊन गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत खेड पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना खेड परिसरात घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे त्यांच्या राजवळ उभे असताना अज्ञात व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी तुला लई माज आलाय, एकाला तर संपवलाय, आज तुलाही संपवतो, असे म्हणत थीगळे यांच्यावर आरोपीने पिस्तूल रोखत पैशाची मागणी करू लागला. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने थिगळे हे थोडक्यात बचावले आहेत.

दरम्यान, दुसरी गोळी आरोपीने हवेत फायारींग केली. त्यानंतर गोळीबार करत आरोपी घटना स्थळावरून फरार झाले आहेत. कुटूंबियांच्या समोर ही घटना घडल्याने घरात भीतीचं वातावरण आहे. मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.