उर्फी जावेद आली रस्त्यावर! मुंबईत भाड्याने मिळेना घर; म्हणाली, मला राजकीय धमक्या…

मुंबई- सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (urfi Javed) ही तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईल आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखली जाते. परंतु भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh vs Urfi Javed) यांनी तिच्या ड्रेसिंग स्टाईलवर आक्षेप घेतल्यापासून तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच आता बिग बॉस फेम उर्फीला मुंबईत राहण्यासाठी घर मिळत नाहीये. भाड्यावर घर घेण्यासाठी ती मुंबईच्या रस्त्यांवर भटकत आहे. कोणी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला घर देत नाहीये, तर कोणी ती मुस्लीम असल्यामुळे तिला नकार देत आहेत. स्वत: उर्फीने सोशल मीडियावर (Urfi Javed New House) आपली व्यथा मांडली आहे.

उर्फीने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘मुस्लिम घरमलाक माझ्या कपड्यांमुळे मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत. मी मुस्लिम आहे (Muslim Religion) म्हणून हिंदू घरमालक मला घर देऊ इच्छित नाहीत. काही घरमालकांना भीती वाटते की मला राजकीय धमक्या मिळतात. मुंबईत भाड्याने अपार्टमेंट मिळणे किती कठीण आहे.’

उर्फीच्या या ट्वीटनंतर युझर्सकडून तिला सहानुभूती मिळत असल्याचे दिसत आहे. तर काहींनी नेहमीप्रमाणे या ट्वीटमुळेही तिला ट्रोल केले आहे.