Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!

Sharad Pawar Masterstroke: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतेच काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसचा हात सोडल्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीसमोर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मविआचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून एक मास्टरस्ट्रोक खेळण्यात आला आहे.

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी (Rajya Sabha Elections) मविआकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. सध्या मविआ आघाडीत सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, शरद पवार यांनी आता ऐनवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास तो मास्टरस्ट्रोक ठरु शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया