रोहित-कोहलीचे हात धरले, शमीला मिठी मारली; विश्वचषकाच्या पराभवानंतर पीएम मोदींचे खेळाडूंना सांत्वन

India Vs Australia Final: कोणत्याही खेळात विजय-पराजय असतोच. कधी संघ सतत जिंकूनही हरतो, तर कधी पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असलेला संघ जिंकतो. हे खेळाचे सौंदर्य आहे. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो की हॉकी. प्रत्येक खेळात जय-पराजय असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी संध्याकाळी ड्रेसिंग रूममध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंची भेट घेतली तेव्हा त्यांनी या गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

वास्तविक, वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने दिलेल्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 गडी गमावत 241 धावा करत विजय मिळवला. या पराभवाने भारतीय चाहत्यांची मनं तुटली, कारण भारत एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचला होता. फायनल पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह स्वतः स्टेडियममध्ये पोहोचले होते.

जेव्हा मोदी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले

ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग पूर्ण करताच त्यांचे खेळाडू धावत धावत खेळपट्टीवर पोहोचले. दुसऱ्या बाजूला निराश झालेले भारतीय खेळाडू होते, ज्यांचे खांदे पराभवामुळे झुकले होते. खुद्द कर्णधार रोहित शर्माच्या  (Captain Rohit Sharma) डोळ्यात अश्रू होते. टीम इंडियाच्या बाकीच्या खेळाडूंचीही अशीच अवस्था होती. मात्र, जेव्हा संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा पंतप्रधान मोदी भारतीय संघातील निराश खेळाडूंना भेटण्यासाठी तेथे पोहोचले. त्यांनी संपूर्ण टीमला भेटून प्रोत्साहन दिले.

विराट-रोहितने हात धरले, शमीला मिठी मारली

पीएम मोदी टीम इंडियाच्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये भेटतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. पीएम मोदी संघातील सर्व खेळाडूंना भेटत असल्याचे दिसून येते. ते पहिल्यांदा रोहित आणि विराट कोहलीला भेटतात. ते रोहितला म्हणताना ऐकू येतो, ‘तुम्ही 10 सामने जिंकून इथे आला आहात. हे (सामन्यातील पराभव) होतच राहते. हसा भाऊ, देश तुम्हाला पाहत आहे.’ यावेळी मोदी रोहित आणि विराटच्या खांद्यावर कौतुकाची थाप देतात.

पीएम मोदी म्हणतात, ‘मला वाटले की मी तुम्हाला भेटावे.’ ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही भेटतात आणि म्हणतात, ‘तुम्ही खूप मेहनत केली आहे.’ यानंतर ते रवींद्र जडेजाला भेटतात. पीएम मोदी मोहम्मद शमीला भेटतात आणि त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, ‘तुम्ही यावेळी खूप चांगले केले.’ पंतप्रधान मोदी भारतीय संघातील सर्व खेळाडूंना भेटून त्यांना प्रोत्साहन देतात.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली