Pune News | कसबा विधानसभा मतदारसंघात रंगलंय पोस्टर वॉर; धंगेकर-रासने पुन्हा आमने-सामने 

Pune News : एका बाजूला लोकसभेची चर्चा असतानाच गेल्या काही काळापासून राजकारणाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात मात्र पोस्टर वॉर रंगताना दिसत आहे. भाजप चे कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आले असून गेल्या वर्षभरात मतदारसंघात (Pune News ) केलेल्या कामांचा पाढा यामध्ये वाचण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना RTE प्रवेशासाठी केलेल्या मदतीपासून ते जुन्यावाड्यांच्या युडीसीपीआर कायद्यातील शिथलता, असे अनेक विषय आपण सोडवले असल्याचा दावा या माध्यमातून करण्यात आला आहे. “होय हे आम्हीच केलं” ही टॅगलाईन देत लावण्यात आलेल्या या पोस्टर्सची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. दुसरीकडे आमदार धंगेकर यांच्याकडून देखील अनेक भागांमध्ये कामाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

धंगेकरांचा फ्लॉप शो 

पोटनिवडणुकीतील आपल्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी कृतज्ञता रॅली काढत पुन्हा एकदा नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम केला, परंतु धंगेकर यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्तेच यामध्ये दिसून आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. नागरिकांचा देखील अत्यल्प असा प्रतिसाद पाहायला मिळाला.  यावेळी पोटनिवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मित्रपक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय धंगेकर यांचा जनाधार देखील कमी होतोय का अशी चर्चा सुरु आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान