Loksabha Election | मोदी-शहांमुळे भाजपात आलो, विश्वासघात करू नका, शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा

Loksabha Election : देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) हे मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. रात्री त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महायुतीच्या नेत्यांशी सह्याद्रीवर चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते आज( बुधवार दि. ६ मार्च) रवाना झाले आहेत. अशातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या वक्तव्यामुळे लोकसभा जागा वाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.

रामदास कदम म्हणाले, लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण, माझी एकच खंत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे.

केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका. माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा’, असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं