लाल महालाचे पावित्र्य भंग करणाऱ्या दोषींना अद्दल घडेल असा धडा पुणे पोलिसांनी शिकवावा – वाघ

पुणे – पुण्यातल्या लाल महाल (Lal Mahal) ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने सिनेमातील गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे (Mansi Patil, Kuldeep Bapat and Kedar Avsare) यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर अनेक राजकीय, सामाजिक आणि कलाविश्वातील लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, आता पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य (Lal Mahal planting case) करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन (Faraskhana Police Station Pune) येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, एका फालतू रिलसाठी वंदनीय छत्रपतींच्या स्मृतींनी पावन झालेल्या वास्तूत लावणी करून त्याचे पावित्र्य भंग करणाऱ्या दोषींना फक्त अटक नाही तर तात्काळ कारवाई करून अद्दल घडेल असा धडा पुणे पोलिसांनी शिकवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.