20 विश्वचषकात आतापर्यंत फक्त एकाच ‘या’ भारतीय फलंदाजाने झळकावले आहे शतक 

मुंबई – T20 विश्वचषकात (T20 World Cup) शतके झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर त्यात फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. टीम इंडियासाठी सुरेश रैनाने शतक झळकावले. तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने (Chris Gayle)  दोनवेळा शतक झळकावले आहे.(Only one Indian batsman has scored a century in 20 World Cups so far)

T20 विश्वचषकात शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना आणि गेलचा समावेश आहे. गेलने दोनदा शतक झळकावले आहे. या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम यांचाही समावेश आहे. इंग्लंडकडून जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी शतके झळकावली आहेत. पाकिस्तानकडून अहमद शेहजादने तर बांगलादेशकडून तमिम इक्बालने शतक झळकावले आहे.

भारतीय खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) 2010 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुफानी कामगिरी केली होती. त्याने अवघ्या 60 चेंडूत 101 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. रैनाचे हे शतक संस्मरणीय ठरले.

पुरुषांच्या T20 विश्वचषकात शतक झळकावणारे खेळाडू:

वेस्ट इंडिज: ख्रिस गेल (दोनदा)

भारत: सुरेश रैना

श्रीलंका: महेला जयवर्धने

न्यूझीलंड: ब्रेंडन मॅक्युलम

इंग्लंड: अॅलेक्स हेल्स, जोस बटलर

पाकिस्तान: अहमद शहजाद

बांगलादेश: तमिम इक्बाल