Mallikarjun Kharge | देशातील प्रत्येक गरिब महिलेला वर्षाला एक लाख रुपये, सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण

Mallikarjun Kharge | भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ घोषणा केल्या असून यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी जाहीर केले.

भारत जोडो न्याय यात्रेच्या महिला हक्क न्याय परिषदेला ॲानलाईन संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महालक्ष्मी गॅरंटी अतंर्गत देशातील सर्व गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, अंतर्गत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के हिस्सा महिलांना दिला जाईल. शक्ती का सम्मान, अंतर्गत आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्न भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे वेतनात केंद्र सरकारचा हिस्सा दुप्पट केला जाईल. अधिकार मैत्री, अंतर्गत महिलांना त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सावित्रिबाई फुले वसतिगृह अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह बांधले जाईल. याआधी काँग्रेस पक्षाने शेतकरी न्याय, युवा न्याय व भागिदारी न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी पोकळ वा जुमले नसतात तर त्या काळ्या दगडावरील रेघ असतात. आमच्या विरोधकांचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा १९२६ पासून जाहिरनामे बनवतो व त्यातील घोषणा पूर्णही करतो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत आमचे हात बळकट करा, असे आवाहनही मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे.

या महिला हक्क न्याय हक्क परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole),, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव सोनल पटेल, हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार शिरिष चौधरी, आमदार अमित झनक, भावना जैन, धुळे काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सकाळी दोंडाईचा पासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली त्यांनतर धुळ्यातील क्रांती स्मारकाला भेट देऊन राहुल गांधी यांनी अभिवादन केले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित केले दुपारनंतर यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला, मालेगाव येथे जाहीर सभा आणि हॉटेल फाऊंटन मालेगाव येथे यात्रेचा मुक्काम असेल.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?