Pune Traffic | पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

Pune Traffic : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील येरवडा, सिंहगड, दत्तवाडी, डेक्कन वाहतूक (Pune Traffic) विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत अग्निशमन केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस २२ मीटर, डाव्या बाजूस १३ मीटर, अग्निशमन केंद्राच्या समोरील मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या फलकापासून उत्तरेस १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे. गोल्फ क्लब चौक ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस व आंबेडकर चौक ते कामराज नगरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस २०० मीटर, शिवाजीनगरकडून शादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर बीआरटी याठिकाणी संगमवाडी गावठाणकडे जाणारा रस्ता ते एस.बी. ट्रॅव्हल्स शोरूम असे २०० मीटर अंतर रस्त्याच्या डाव्या बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.

सिंहगड रस्ता वाहतूक विभागाअंतर्गत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पाठीमागच्या प्रवेशद्वारासमोरील पॉलीहब फुडकोर्ट, कॅफे एन २ एस २ समोर सर्वे नं. ४५/२बी/२, शिवतीर्थ सोसायटी लेन नंबर १, वडगाव बु. पुणे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ३० मीटर पर्यंत तर दत्तवाडी वाहतूक विभागाअंतर्गत नवश्या मारुती मंदिर ते स्वामी विवेकानंद चौक रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूस २०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत प्रभात रस्ता गल्ली नंबर ३ वर रामचंद्र निवास ते बिकुल सोसायटी पर्यंत, ऋतुजा बेकरी ते अजित बंगल्याच्या ठिकाणी व घरकुल सोसायटी, मयुर सोसायटी, सरस्वती अपार्टमेंट, रामराजे निंबाळकर बंगला, गंगाभवन, सेंटर कोर्टच्या बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे. तर प्रभात रस्ता गल्ली नंबर ३ वर शाळीग्राम बंगल्यापासून ते विनीता अपार्टमेंट पर्यंत, निसर्ग अपार्टमेंट ते जानकी आश्रम पर्यतच्या रस्त्यावर प्रवेशद्वार सोडून दुचाकीसाठी पी १, पी २ पार्किंग व प्रशांत बंगल्यापासून पुढे असलेला रानडे बंगल्यापर्यंत प्रवेशद्वार सोडून दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे.

वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १४ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे