काँग्रेसने कायम दलितांना दाबण्याचे काम केले, त्यांना न्याय दिला नाही – आठवलेंचे खरगे यांना प्रत्युत्तर

Ramdas Athwale- दलितांना न्याय देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात होत आहे. काँग्रेसच्या सत्ता काळात दलितांना न्याय मिळाला नाही.काँग्रेसच्या सत्ता काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे कोणतेही काम कधीही झाले नाही.जेव्हा जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा सन्मान करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा काँग्रेसने धोका दिला आहे. असे प्रत्युत्तर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके उभारली आहेत. अनेक योजनांद्वारे दलितांच्या उत्कर्षाचे काम होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या काळात दलितांना न्याय मिळणार नसल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आरोप निराधार आणि चुकीचा आहे. उलटपक्षी काँग्रेसनेच अनेक वर्षे दलितांना दाबण्याचे काम करीत आहे असा टोला ना.रामदास आठवले यांनी काँग्रेस ला लगावला.

दिल्लितील 15 जनपथ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र,26अलीपुर रोड येथील निर्वाणभुमी स्मारक,लंडन मधील संग्रहालयरुपी स्मारक आणि मुंबइत इंदु मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम केले आहे.त्यामुळे मोदींच्या काळात दलितांना न्याय मिळणार नसल्याचा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप निराधार चुकिचा आहे.उलट काँग्रेसच्या सत्ता काळात दलितांना वर येवू न देण्याचे ,दलितांना दाबण्याचे काम झाले आहे.असे प्रत्यत्तर आज रामदास आठवले यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिले.आज बांद्रा येथे ना. रामदास आठवले यांच्या निवासस्थानी पत्रकाराशी झालेल्या वार्तालापात आठवले बोलत होते.

काँग्रेसने नाईलाज म्हणुन मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष केले आहे.मात्र जेव्हा कर्नाटकात मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसने दलित नेते म्हणुन मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही.दलित नेते म्हणुन मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसने वर य़ेवू दिले नाही त्यांना दाबले.दलितांना वर येण्यापासून रोखण्याचे,दलितांना दाबण्याचे काम काँग्रेसच करित आहे.असा घणाघात ना.रामदास आठवले यांनी आज केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान काँग्रेसने कधी ही केला नाही उलट त्यांचा दोन वेळा लोकसभा निवडणुकित पराभव केला. काँग्रेसला त्यांच्या सत्ता काळात जातीभेद मिटवण्यास यश मिळाले नाही.जातीवाद संपवण्यात काँग्रेस अपयशी ठरले त्यामुळे आज ही दलितांवर अत्याचार होत आहेत असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’