CPL : 140 किलो वजनी खेळाडूने झळकावले झंझावाती शतक; अनोख्या सेलिब्रेशनमुळे होतेय चर्चा

Rahkeem Cornwall’s sensational century : बार्बाडोस रॉयल्सचा खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall) कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट किट्स नेव्हिसविरुद्ध 48 चेंडूत 102 धावा केल्या. रहकीम कॉर्नवॉलने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र या खेळाडूने शतक झळकावल्यानंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बार्बाडोस रॉयल्ससमोर विजयासाठी 221 धावांचे लक्ष्य होते. बार्बाडोस रॉयल्स संघाने 18.1 षटकात 2 बाद 223 धावा करत सामना जिंकला. रहकीम कॉर्नवॉल व्यतिरिक्त, बार्बाडोस रॉयल्सकडून रोव्हमन पॉवेलने 26 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. सेंट किट्स नेव्हिससाठी कॉर्बिन बॉश आणि डॉमिनिक ड्रेग्स यांना 1-1 असे यश मिळाले. मात्र, रहकीम कॉर्नवॉलच्या शानदार शतकामुळे बार्बाडोस रॉयल्सने मोठे लक्ष्य सहज गाठले.दुख

महत्वाच्या बातम्या – 

सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल