Sanatan Dharma : इंडिया आघाडीतील नेता बरळला; सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली

Udayanidhi : INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे मत व्यक्त करताना उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना करोना विषाणू, मलेरिया, डेंग्यू आदी डासांमुळे होणाऱ्या रोगांच्या जंतूंशी केली. या रोगजंतूंना केवळ विरोध न करता ते नष्ट केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या 200 रुपयांनी स्वस्त होणारे गॅस सिलिंडर खरोखरच बहिणींसाठी रक्षाबंधन भेट ठरेल का?

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार