सत्तेसाठी गेलो नाही लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो –  Sunil Tatkare

 Sunil Tatkare – म्हसळा – नियत साफ असेल, धर्मनिरपेक्षता मनात असेल तर कधीच मनात वैफल्यता येत नाही. महायुतीच्या सभेत एकत्र काम करताना एकमेकांना साथ दिली पाहिजे असे सांगितले. यावेळी माझ्या २० मिनिटातील २१ सेकंदाची एक क्लीप इथे फिरवण्यात आली मात्र क्लीप फिरवल्यावरही माणगाव आणि म्हसळा येथील मुस्लिम समाजासोबत असलेले ऋणानुबंध कायम असल्याचे आजच्या मेळाव्यातून सिद्ध झाले असून मुस्लिम (Muslim) समाज माझ्या पाठीशी उभा आहे हे स्पष्ट झाले अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपली भावना व्यक्त केली.

दरम्यान समाजासमाजात गैरसमज निर्माण करण्याचे काम करणार्‍या विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. आम्ही अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत (NDA) गेल्यावर समज – गैरसमज पसरवले जात असल्यामुळे हा अल्पसंख्याक मेळावा (Minority meeting) आपण घेतल्याबद्दल सुनिल तटकरे यांनी माणगाव आणि म्हसळा येथील मुस्लिम बांधवांना धन्यवाद दिले.

या भागात भावनेच्या आधारावर राजकारण केले जात होते त्यावेळी आपल्या सहकार्याने मी या मतदारसंघात पाऊल टाकले त्यामुळे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली.जेव्हा आपण राजकीय ताकदवान होतो त्यावेळी गैरसमज निर्माण केला जातो. होय, आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो असे ठणकावून सांगतानाच ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

होय, आम्ही नवी भूमिका घेतली परंतु धर्मनिरपेक्ष भावनेने काम करण्याचे सोडणार नाही असे स्पष्ट केले आहे मात्र आमच्याबद्दल काही विघ्नसंतोषी लोक गैरसमज निर्माण करत आहेत.

आज म्हसळा बाजारपेठेतून कार्यक्रमस्थळापर्यंत रॅली काढली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या त्याबद्दल ‘भाई के नाते बहनने जो तोहफा आज दिया है वो जिंदगीभर मै भुलुंगा नही’ असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

लोकांच्या हिताच्यादृष्टीने पाऊले उचलली तर लोकं आपल्या बाजूने राहतात हे सांगतानाच बॅ. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यासाठी जी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करण्याची संधी मला मिळत आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या महाराष्ट्रात आणि या म्हसळयात काय काय घडले ते आज सांगणार नाही ते पत्ते मी योग्य वेळी खोलेन असा इशाराही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

सत्तेसाठी गेलो नाही लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो. त्यामुळे आज करोडो रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला जात आहे हेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

दिघी बंदरावर १४० स्थानिक कामगारांना कायम करण्याचे काम केल्याचे सांगतानाच रायगडच्या प्रत्येक तालुक्यात योजना पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला धर्मनिरपेक्षपणाचा निर्णय योग्य ठरला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

तुमच्या विश्वासाच्या बळावर मी उभा आहे त्यामुळे तुमचे पाठबळ हीच माझी खरी शक्ती, प्रेरणा आहे. भविष्यात तुमचे असेच प्रेम आणि आशिर्वाद कायम पाठीशी ठेवा.. कुणीही किती क्लीप पाठवल्या तरी विश्वास ठेवू नका. मी जनतेसाठी २४ तास उपलब्ध आहे असे सांगतानाच सत्ता ही लोकांच्या कामासाठी उपयोगी करायची असते त्यातूनच काम करत आहे असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

नवाबभाई मलिक यांनी या महामंडळासाठी १०० कोटी देण्याची मागणी केली होती ती मंजूर करण्यात आली आणि आज अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने महामंडळासाठीचे भागभांडवल ५०० कोटीच्यावर नेण्याचे काम अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे याची आठवणही सुनिल तटकरे यांनी सांगितली.

अफवांवर विश्वास न ठेवता तुमची ताकद माझ्या पाठीशी रहावी असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. बॅरिस्टर अंतुले यांचे नेतृत्व आपण सर्वांनी पाहिले. अलीशेठ कौचाली यांचेही काम अनुभवले आहे. त्यांच्या कामाबद्दल खासदार सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.अफाट प्रेम आणि शक्ती उभी केली त्या म्हसळाच्या जनतेला सुनिल तटकरे यांनी यावेळी धन्यवाद दिले.

राजकीय भूमिका घेतल्यानंतर आज रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि म्हसळा येथील अल्पसंख्याक बांधवांशी सुनिल तटकरे यांनी संवाद साधला. यावेळी सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात होत असलेल्या अनेक विकासकामांचा उल्लेख केला. म्हसळा तालुका अल्पसंख्याक सेलचा भव्य मेळावा आज म्हसळा शहरातील घनसार सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

मेळाव्यास्थळी येण्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचे म्हसळा बाजारपेठेत बाईक रॅली काढून मुस्लिम युवकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालकल्याण विकासमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश चिटणीस मुखत्यार वेळासकर, प्रदेश सरचिटणीस अतिक खतीब, दापोली विधानसभा अध्यक्ष मुजीब रुमाणे, दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगी, श्रीवर्धनचे अध्यक्ष महम्मद मेमन, अल्पसंख्याक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष नाझीम हसवारे, जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफशेठ धनसे, उपाध्यक्ष हिदायत कुदरते, म्हसळा नगराध्यक्ष हसल काद्री आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या 200 रुपयांनी स्वस्त होणारे गॅस सिलिंडर खरोखरच बहिणींसाठी रक्षाबंधन भेट ठरेल का?

Sanatan Dharma : इंडिया आघाडीतील नेता बरळला; सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे