CM शिंदेंना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, फक्त 5 रुपयांसाठी…

लोणावळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि एकच खळबळ उडाली. मात्र, तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट नव्हताच अशी माहिती उघडकीस आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ल्याचा कट असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणाला लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) अटक केली आहे. मूळचा आटपाडीचा रहिवासी असलेला अजय वाघमारे हा मुंबईला (Mumbai) जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. यावरून हॉटेल मालकाशी भांडण झाले. यामुळे वाघमारेने हे कृत्य केले असल्याचे समोर आलं आहे.

हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी वाघमारे याने केला होता. पोलिसांना खोटा कॉल केल्याची माहिती आहे. पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झी 24 तासने ही बातमी दिली आहे.