Rahul Gandhi Joins BJP: राहुल गांधी यांचा भाजपात प्रवेश, नेमकी काय आहे भानगड?

Rahul Gandhi Joins BJP: लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा देशात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर ४ जूनला निवडणुकांचा निकाल लागेल. दरम्यान राहुल गांधी यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल गांधी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थ नेतृत्त्व आणि देशातील तमाम बंधू-भगिणींसाठी मोदी करत असलेल्या लोकोपयोगी कामांना प्रभावित होऊन आपण भाजपाचा हात धरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?