Sharad Pawar : शरद पवार पडणार एकाकी ? उर्वरित आमदारही महायुतीत जाणार? 

Shambhuraj Desai – काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे.यातच आता शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे.

शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे, असा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.

शंभूराज देसाई म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. असे बरेच लोक आहेत. आमचे दोन-तीन जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्याशी याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर संबंधित सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहेत.

“दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे. दसऱ्यातही आपण जोरदार धमाके करतो, उत्साह साजरा करतो. त्यामुळे जसं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ९ मंत्र्यांनी अचानक शपथ घेतली, तसंच कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही मंत्री देसाई यांनी पुढे नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले