Govt scheme इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना नेमकी काय आहे ? लाभ कुणाला मिळतो ?

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

योजनेचे लाभार्थी
१८ ते ७९ वयोगटातील अपंग यांना ही योजना लागू आहे.

योजनेच्या अटी(Terms of the scheme)

• कुटुंबाचे नाव ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे.
• ८० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरतात.
• अपंग असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• लाभार्थी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे(Necessary documents)

वयाबाबतचा पुरावा, शिधापत्रिका व आधार कार्डची छायांकित प्रत, नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील किंवा तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला व मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी.

मिळणारा लाभ(Benefit received)

लाभार्थ्यांना प्रतिमाह १ हजार रुपये अनुदान दिले जाते. तथापि एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना १ हजार १०० व दोन व त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना १ हजार २०० प्रती लाभार्थी अर्थ सहाय्य देय आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रासह अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा लागतो.

अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयातील संबंधित शाखेत संपर्क साधावा