Rohit Pawar | पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, लढू आणि जिंकू; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास

Rohit Pawar on NCP Party and Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे. दरम्यान रोहित पवार यांनी ‘आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!’, असं म्हणत लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मिडीया एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, “केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! #लडेंगे_और_जितेंगे!”

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?