जो नाही झाला काकांचा, तो काय होईल… Jitendra Awhad यांची अजितदादांवर जहरी टीका

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. तर शरद पवार ( Sharad Pawar) गटांनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं असल्याचं शरद पवार यांच्या कन्या आणि राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awad) काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं लिहीत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

एवढंच नव्हे तर ‘ भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है ‘ असं ट्विटही त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?