‘भारतात सतत होणाऱ्या पराभवांमुळे खचून न जाता नेपाळच्या राजकारणात संधी शोधताना राजकुमार साहेब …’

पुणे – परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ ( Videos from nightclubs ) सध्या व्हायरलझाला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये ( Kathmandu )हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर ( Former BJP MLA Yogesh Tillekar ) यांनी देखील या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. भारतात सतत होणाऱ्या पराभवांमुळे खचून न जाता नेपाळ च्या राजकारणात संधी शोधताना राजकुमार साहेब … असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी होण्याची शक्यता आहे.