देशात शेतकरी, महागाईसह विविध प्रश्नांवर पांघरून टाकण्यासाठी भोंग्यांचा प्रश्न पुढे केला जातोय – छगन भुजबळ

नाशिक – देशात खोटा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजविलं त्यांच्याच खरा इतिहास समोर उभा आणला जाईल. देशात शेतकरी ( Farmers ), महागाई अडचणींवर पांघरून टाकण्यासाठी भोंग्यांचा प्रश्न पुढे आणला जात असून महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) हे अतिशय उत्तमपणे सांभाळत आहे. त्यामुळे राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी राज्याचा कारभार करत असतांना अडचणी निर्माण करून मनाचा कोतेपणा दाखवू नये अशी टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister for Food, Civil Supplies and Consumer Protection and Nashik District Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांनी केली.

येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे ( Shivsrishti Project ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या शुभहस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राज ठाकरे का घेत नाही ? असा सवाल उपस्थित करत राज्यात केवळ तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करून करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले सद्या लोकमान्य टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी यांची समाधी बांधली असा प्रचार केला जात असून पुरंदरे, स्वामी, टिळक यांना मोठं करायचं आणि शरदचंद्र पवार यांना जातीयवादी ठरविण्याचा कट केला जात आहे. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, अंतिम संस्कारानंतर  तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली होती, पुढे छत्रपती  संभाजी महाराजांची  राजवट आली, संभाजी महाराजांनंतर ला रायगड किल्ला मोघलांनी जिंकला आणि त्यांनी त्याचे नाव इस्लामगड केले. पुढे हा किल्ला मोघलांच्या ताब्यात होता, पेशव्यांनीतो परत जिंकला, तो पर्यंत समाधीचा उल्लेख सापडत नाही. १० मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल फ्रॉथरने तो ताब्यात घेतला आणि १८१९ मध्ये कोलाबा गॅजेटमध्ये शिवसमाधीचा पहिल्यांदा उल्लेख आला. पुढे राजयगडाचा पूर्ण नकाशा आणि अंदाज घेऊन इंग्रजांनी पुन्हा मराठे साम्राज्य उभारतील या दृष्टीने सर्व किल्ले निर्मनुष्य केले, त्यानंतर अनेक वर्षे तो किल्ला ओस पडला, त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८७९ समाधी शोधली आणि त्यावर पोवाडा लिहिला. त्यावेळेस टिळक १३ वर्षांचे होते असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व  समाधी जीर्णोद्धार व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांची ईच्छा होती, त्यांनी तसे जाहीर केल्यानंतर टिळकांनी लगेच हिंदू महासभेची सभा बोलवून आम्ही लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करू जाहीर केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी" नावाने आयुष्यभर निधी गोळा केला. शाहु महाराज यांनी देखील लोकमान्य टिळक यांना मदत केली आहे. आणि आपल्या उभ्या हयातीत त्यांनी रायगडावर एक खडा देखील बसविला नाही.१९२६ ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरात बँक बुडाली उघड झाले, मग इंग्रजांनीच छत्रपती शिवाजी समाधीचे काम हाती घेतले मूळ अष्टकोनी चौथरा मग त्यावर छोटा अष्टकोनी चौथरा आणि त्यावरच राजपूत पद्धतीचे छत्र हे इंग्रजांनी बांधले ते १९२७- २७ दरम्यान. मग याशी टिळकांचा संबंध एवढाच कि त्यांनी केवळ पैसे गोळा केले आणि ते दुसरीकडे वळवले, याचे सर्व पुरावे आणि उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.