‘आदिल माझा नग्न व्हिडीओ विकायचा…’, पतीच्या आरोपांवर चिडली राखी सावंत, केले गंभीर आरोप

रिअॅलिटी शो क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आदिल खान दुर्रानीसोबतचे (Adil Khan Durrani) तिचे लग्न पुन्हा चर्चेत आले आहे. आदिल खानची ६ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याने राखी सावंतवर आरोप केले. राखी सावंतने आपले न्यूड व्हिडिओ बनवले, ड्रग्ज दिले आणि लाखो कोटी रुपये खर्च केले, असे त्याने म्हटले होते. त्यामुळे आता 22 ऑगस्ट 2023 रोजी राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन आदिल दुर्राणीच्या सर्व आरोपांना उत्तर दिले.

राखी सावंतने आदिल खान दुर्राणीवर मोठा आरोप केला की तो मुला-मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवत असे. हे घाणेरडे काम तो स्वतःच्या घरी करायचा. याचा राखीने विरोध केला तर तो तिला मारहाण करायचा.

आदिलने माझे न्यूड व्हिडिओ बनवले आणि विकले
पत्रकार परिषदेत राखी सावंतला अश्रू अनावर झाले. मोठा खुलासा करताना राखी म्हणाली, ‘आदिल खानने माझे न्यूड व्हिडिओ बनवले आणि एका अरब माणसाला ५०-५५ लाख रुपयांना विकले. माझ्या हनिमूनचा व्हिडिओ बनवला, नंतर बाथटबचा खासगी व्हिडिओ बनवला आणि काही लाख रुपयांना विकला.’

राखी सावंत आणि तिच्या वकिलानेही ड्र’ग्ज देण्याच्या आरोपांना उत्तर दिले. राखीने म्हटले की, जर खरेच असे असेल तर आदिलने ही गोष्ट कोर्टात का ठेवली नाही. तेव्हाच त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करायला हवा होता. पण आता सहा महिन्यांनंतर त्यांना हे सर्व आठवत आहे. हे सर्व आरोप राखी सावंतने खोटे असल्याचे म्हटले आहे.