Ramdas Athawale – रिपब्लिकन युवकांना सत्तेचा वाटा मिळवून देणार

Ramdas Athawale – रिपब्लिकन (Republicans) युवकांनी सत्तेपेक्षा संघर्षाला महत्व दिले पाहिजे. सत्ता नाही तर सामाजिक परिवर्तन हे आपले उद्दिष्ट्य आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा गावागावात पोहोचवा. अन्यायाविरुद्ध संघर्ष ची धार तीव्र ठेवा.संघर्षशील रिपब्लिकन युवकांना योग्य वेळी सत्तेचा वाटा आपण निश्चित मिळवून देऊ. आगामी महापालिका निवडणुका; (Municipal elections) विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन युवकांना संधी दिली जाईल असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी चा युवा मेळावा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन युवकांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून रिपाइं युवा मेळावा यशस्वी केला. महायुती च्या विजयासाठी रिपब्लिकन युवकांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी ना.रामदास आठवले यांनी केले.

या मेळाव्यात ना.रामदास आठवले यांचे सुपूत्र कुमार जित आठवले यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूरची जागा आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीने सोडावी तसेच रिपब्लिकन युवक आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे यांना रिपब्लिकन पक्षातर्फे विधान परिषदेवर नियुक्ती द्यावी आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइं ला एक मंत्री पद मिळावे व त्यासाठी पप्पू कागदे यांची निवड करावी असा ठराव आज ना.रामदास आठवले यांच्या समक्ष रिपब्लिकन युवक आघाडीने एकजुटीने मंजूर केला.रिपाइं च्या मुंबई युवा मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल ना.रामदास आठवले यांनी रिपाइं युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते यांचे कौतुक केले. रिपब्लिकन युवकांनी त्यांच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नये आणि हवेत राहू नये असा सल्ला ना.रामदास आठवले यांनी युवकांना दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

रिपाइं च्या युवक आघाडी च्या मेळाव्यास शिवसेने चे खासदार राहुल शेवाळे; हिंगोली चे खासदार हेमंत पाटील ; रिपाइं चे राष्ट्रिय सरचिटणीस अविनाश महातेकर; सुरेश बारशिंग; दयाळ बहादूर; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; जिल्हा अध्यक्ष संजय पवार; रवी गायकवाड; सातारा चे स्वप्नील गायकवाड; तसेच युवक आघाडी चे सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. प्रा विजय मोरे यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा लढा अविरत लढून जिंकला.ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात नामांतर; गायरान जमीन पट्टे वाटप इंदूमिल आदी अनेक आंदोलने लढे उभारुन यशस्वी केले. इंदूमिल च्या लढ्यात रिपब्लिकन युवकांनी आक्रमक आंदोलन करीत इंदूमिल चा ताबा घेतला होता. आता त्या जमिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जात आहे याची आठवण यावेळी रिपाइं युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे यांनी सांगितली.
रिपब्लिकन युवक आघाडी रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करीत राहील असे निर्धार रिपाइं चे युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

Pune Loksabha Election | खासदार म्हणून पुणेकरांची पसंती कोणाला? माध्यमांच्या सर्व्हेत ‘हे’ नाव आघाडीवर

‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा