राष्ट्रवादी शिवसेनेत भांडण लावून मजा पाहतेय; सेनेच्या आमदाराचं थेट खटक्यावर बोट 

गुवाहाटी : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

दरम्यान,  शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत”, असा गंभीर आरोप आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे.गुवाहाटीमध्येही बैठका होतायत. पत्रव्यवहारांची माहिती इथल्या आमदारांना दिली जातेय. उपाध्यक्षांबाबत अविश्वास पाठवला जातोय. राष्ट्रवादीला वाटतयं की बंडखोरांना कायद्याच्या कचाट्याच आम्हाला ते अडकू पाहतील. पण हे सगळं नियमबाह्य आहे. त्यांनी तसं केलंच, तर त्यांना आम्ही उत्तर देऊच. यापूर्वी कधीही राष्ट्रवादीचे कोणतेही नेते शिवसेना भवनाची पायरी चढताना पाहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालतोय की काय, अशी आम्हाला शंका येतेय. शिवनेसा आमचीच आहे. राष्ट्रवादी शिवसेनेत भांडण लावून मजा पाहतेय”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.