Sunetra Pawar | बारामतीला देशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात आणण्यास मी पूर्ण ताकद पणाला लावेल

Sunetra Pawar | गेल्या 20 वर्षा पासून मी समाजकारणात कार्यरत आहे. हे करताना महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण अशा विविध गोष्टींना न्याय देण्याचं काम मी करत आहे. मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी हातात घेतल्या त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे महायुतीतल्या नेत्यांनी आणि बारामतीकरांनी माझ्यावर लोकसभेची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखविला आहे; तो नक्कीच मी खरा करून दाखवीन, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांनी दिली. बारामतीला देशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात आणण्यास मी आपली पूर्ण ताकद पणाला लावेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित  सभेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआय (आठवले गट)चे रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली विकास कामे ही अजित पवारांनी केलेल्या कामाची पावती आहे. बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रात एक विकासाचा मॉडेल बनवून राहिलेला आहे.  हे अजित पवारांची दूरदृष्टी व कष्टाचा फळ आहे. विकासासाठी राजकारण न करणारे अजित पवार हे जनतेच्या मनातील नेते आहेत. अजित पवारांचा मोदी सरकार सोबत जाण्याचा निर्णय हा केवळ विकासासाठी घेतलेला आहे. त्यावर बारामतीतील जनता नक्कीच शिक्कामोर्तब करेल,  असा मला विश्वास वाटतो. मागील दहा वर्षात बारामतीत झालेल्या विकास काम ही केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे व अजित पवारांच्या नेतृत्वामुळे झालेली आहेत. अन् आगामी काळात देखील  विकासाची झेप घेईल, असा मला विश्वास वाटतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात