मुकेश अंबानींना जिवे मारण्याच्या धमक्या, ईमेलद्वारे 20 कोटी रुपये मागितले

Mukesh Ambani: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या (Death Threats To Mukesh Ambani) आल्या आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न दिल्यास आपला जीव गमवावा लागेल, असे म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता.  धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये लिहिले होते- तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत  हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी भादंवि कलम ३८७ आणि ५०६ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मुकेश अंबानी यांना पहिल्यांदाच धमक्या आल्या असे नाही. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घराला बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतर अँटिलियाची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार