नेता पावरफुल : रामदास आठवले यांचा ग्रेट ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये होणार सत्कार

Ramdas Athawale –  ग्रेट ब्रिटनच्या लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (World Book Of Record) या लंडनमधील प्रतिष्ठित संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये ना. रामदास आठवले यांचा डॉक्टर भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड प्रमुख ऍड.संतोष शुक्ला यांनी दिली आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड च्या निमंत्रणावरून ना.रामदास आठवले आज दि.13 सप्टेंबर रोजी  पहाटे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला रवाना झाले. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले हे सुद्धा लंडन दौऱ्यामध्ये आहेत.

ना.रामदास आठवले हे चार दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असून या दौऱ्यात दिनांक 14 सप्टेंबर रोजी लंडनच्या ब्रिटिश पार्लमेंट मध्ये ना. रामदास आठवले यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड 2023 या आंतरराष्ट्रीय  पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर लंडनमधील विविध संस्था आणि भारतीय मूळ वंशाच्या उद्योजकांना तसेच आंबेडकरी चळवळीच्या आणि आणि बौद्ध धम्म प चळवळीच्या मान्यवरांना रामदास आठवले भेटणार आहेत. या दौऱ्यात ना. रामदास आठवले यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र जीत आठवले आणि युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे  सोबत आहेत.

https://youtube.com/shorts/Tn13poRRNl4?si=Fnp7msXQ_47fDZ0H

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून