kasba bypoll election result: कसब्यात देवेंद्र फडणवीस विरोधात तक्रार

Pune – पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि  कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. एका बाजूला मतमोजणी होत असताना दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारात फडणवीसांनी हिंदुत्वासाठी मतदान करा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे.