बाबरी पाडली तेव्हा मीही त्याठिकाणी होतो, एकही शिवसैनिक नव्हता, खोटं बोलू नका – दानवे

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) ,बाबरी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्यासाठी आपण अयोध्येत उपस्थित असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने (BJP) देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

बाबरी पाडली तेव्हा मी त्याठिकाणी होतो. त्यावेळी एकही शिवसैनिक (Shiv Sainik) नव्हता. उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला खोटं सांगू नये, दिशाभूल करु नये, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. राज्यात सुरु असलेल्या विकासाविषयी बोलायला हवं. मुंबई तोडण्याचा कुणाचाही इरादा नाही. मुंबई ही अभेद्य आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच आगामी काळात भाजपा काय आहे, हे दाखवून देऊ, असा इशारा देखील रावसाहेब दानवे यांनी दिला.