आजची शांतता, उद्याचं वादळ…; तेजस ठाकरेंचं ‘ते’ पोस्टर बनलंय चर्चेचा विषय

Mumbai – सध्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackray) नेतृत्त्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय ठरतंय. हे पोस्टर आहे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचं (Tejas Thackeray) . आजची शांतता, उद्याचं वादळ… नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे या आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय.

‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का हे पाहावं लागणार आहे.