काँग्रेस- ठाकरे गटात जुंपली; जागावाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना झापलं

sanjay raut: काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लोकसभेच्या २५ जागांवर दावा सांगितला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना झापलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होईल. तसेच, आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहोत, असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही ( २१ डिसेंबर ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली