धाराशिव लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांचे नाव भाजपकडून आघाडीवर!

Pravinsinh Pardesi- धाराशिव लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार खासदार ओमराज निंबाळकर यांना लढत देण्यासाठी  भाजपकडून सध्या स्वछ प्रतिमेचे सेवा निवृत्त आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. याला भाजपचा ही पाठिंबा असल्याची चर्चा असून महायुतीतून भाजपकडून आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

सध्या धाराशिव लोकसभेचे विधमान खा ओमराजे निंबाळकर हे शिवसेना (उबाठा) गटाचे आहेत तर शिवसेनेची जागा म्हणून महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून धनंजय सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून सुरेश बिराजदार यांचे नावे चर्चत आहेत. सध्या तरी शिवसेना (उबाठा)चे विधमान खा ओमराजे निंबाळकर यांची लोकसभा मतदार संघात बाजू वरचढ मानली जाते आहे.

माञ धाराशिव लोकसभा मतदार संघात कमळ फुलवायाचे या उद्देशाने भाजप कामाला लागली आहे. भाजप कडून अचानक मित्रा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव आघाडीवर आहे. सेवा निवृत्त आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी या निष्कलंक निस्पृही प्रशाषणातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे.

1993 मध्ये झालेल्या भूकंपानंतर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात परदेशी यांचे महत्त्वाचे योगदान होते. धाराशिव जिल्ह्याला पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर सांगली येथे येणाऱ्या पुराचे पाणी बोगद्या मार्फत धाराशिवला वळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास धाराशिवला 12 महिने पाणी उपलब्ध होणार, यासाठी आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नांना यश येवुन लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास येणार.

आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांची कर्मभूमी धाराशिव लातुर व जन्मभूमी सोलापूर आहे तिन्ही जिल्हयात हे परिचित आहे. त्यातच भाजपने अनेक सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांना संधी दिली असुन त्याचे त्यांनी कामाचा माध्यमातून सोने केले आहे. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिव लोकसभा मतदार संघातुन आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशींना संधी देणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. प्रविणसिंह परदेशी सध्या मिञा या महाराष्ट्र निती आयोगाचे सीओ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी चेअरमन असलेल्या मिशन कर्मयोगी संस्थेत एमडी म्हणून काम करीत आहेत. या दोन व युटीएसऐफ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जिल्हयात जवळपास एक लाख महिला व कर्मचारी शी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.
निष्कलंक विकासभिमुख नेतृत्व व स्वछ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आल्याचे समजते. प्रविणसिंह परदेशी हे पंतप्रधान नरेंद्रमोदी व उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या अंत्यत जवळचे असुन धाराशिव जागा भाजप सुटुन प्रविणसिंह परदेशी यांची उमेदवारी निश्चित मानले जाते. विद्यमान खा ओमराजेच्या तोडीस तोड उमेदवार प्रविणसिंह परदेशी ठरु शकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार