देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिल्यास मला आनंदच होईल – बापट

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्री य अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

दरम्यान, आता फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मला आनंदच होईल. असे वक्तव्य पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. उमेदवारी देणे हे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे, नेत्यांचे काम आहे. संघटना उमेदवार ठरवत नाही. त्यांनी त्यांचा प्रचार करावा, असे गिरीश बापट म्हणाले.