Raveena Tandon: प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने पोटच्या मुलांना सांगितली आपली सर्व अफेअर्स

Raveena Tandon: बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन हीदेखील सध्या तिच्या रिलेशनशीपमुळे (Raveena Tandon Relationship) चर्चेत आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, तिने तिच्या मुलांपासून तिच्या अफेयर्सबद्दल (Raveena Tandon Affairs) काहीही लपवले नाही.

रवीना म्हणाली,  ‘१९९० मध्ये माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी लिहिण्यात आल्या.’ अशात मुलींना कोणत्याही गोष्टी चुकीच्या मार्गाने माहिती झाल्यास ते योग्य राहणार नाही… म्हणून खुद्द रवीनाने तिच्या सर्व रिलेशनशिपबद्दल आई झाल्यानंतर मुलींना सांगितल्या. रवीनाला दत्तक घेतलेल्या दोन मुली आणि पोटची एक मुलगी राशा थडानी आहे.

रवीना म्हणाली, ‘माझ्या मुली मला जज करतील असं मुळातच मला नको होतं. त्यांना गोष्टी मी स्वतःहून सांगितल्या ज्यामुळे त्यांना सामोरे जायला त्यांना कठीण वाटणार नाही. मी मुलींना माझ्या सर्व रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट पोहोचू नये असं मला वाटतं…’

‘माझ्या मुलींना सर्व सत्य माहिती आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही, माझ्याबद्दल लोकांमध्ये काय चर्चा सुरु आहेत. माझ्या मुली मला समजून घेतात.’ असं देखील रवीना टंडन म्हणाली.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण